FAIR EXCELLENT REASONABLE
JalPurush Dr. RajendraSingh Ji
Concept By

Mr.Harish Butle

' हा संकल्प आहे '

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

Feedback

भाऊ गावंडे

तुम्ही आम्ही पालक
जागरूक पालकत्वाची भूमिका जपणारे मासिक

नुसतं मासिक काढणं हे एक दिव्यच असते. एक तर मुळात मासिक काढणं हा एक आत बट्ट्याचा व्यवहार असतो आणि त्याचं आर्थिक गणित जुळवणं कठीणच असतं. बरं काढलं तर वाचक मिळवणं आणखीन दिव्य! त्यातल्या त्यात मराठीत वाचक मिळवणं अजून अडचणीचं. आणि एखाद्या विषयावरचं मासिक काढायचं म्हटलं तर ते एक धाडसच ठरते. काही लोक ते काढणाराला वेड्यातच काढतात.

तुम्ही आम्ही पालक
जागरूक पालकत्वाची भूमिका जपणारे मासिक

नुसतं मासिक काढणं हे एक दिव्यच असते. एक तर मुळात मासिक काढणं हा एक आत बट्ट्याचा व्यवहार असतो आणि त्याचं आर्थिक गणित जुळवणं कठीणच असतं. बरं काढलं तर वाचक मिळवणं आणखीन दिव्य! त्यातल्या त्यात मराठीत वाचक मिळवणं अजून अडचणीचं. आणि एखाद्या विषयावरचं मासिक काढायचं म्हटलं तर ते एक धाडसच ठरते. काही लोक ते काढणाराला वेड्यातच काढतात. याही उपर ते काढायचं ठरवलं तर अशा मासिकाचे विषय कोणते, त्याचे लेखक कोण असणार, शिवाय खंड न पडू देतात नीरनिराळ्या पैलूंना हात घालून ते गरजूंच्या पुढ्यात कसे ठेवणार? असे अनेक प्रश्न उभे ठाकतात. त्याच्या पुढची समस्या म्हणजे आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी वाचक वर्ग मिळवणं! ह्या सगळ्या दिव्यांचा विचार न करता पाच वर्षांपूर्वी “तुम्ही आम्ही पालक” हे मासिक सुरु झालं आणि तेव्हापासून अखंडपणे चालवल्या जात आहे. त्याचं एक वैशिष्ट्ये म्हणजे कोणतीही जाहिरात न घेता स्वबळावर स्वत:च्या आर्थिक मिळकतीतून मासिक चालवण्याचा घेतलेला निर्णय! खरं तसं पाहिलं तर कोणत्याही नियतकालीकाचा महत्वाचा आर्थिक भार अशा जाहिरातींवरच असतो. त्यांना फाटा देणे हे धाडस आणि वर नमूद केल्याप्रमाणे आतबट्ट्याचा व्यवहार होता आणि आहे. या पार्श्वभूमीवर या मासिकाची वाटचाल बघणे आवश्यक आहे. सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं पाहिजे की या मासिकाला तसा कोणताही शैक्षणिक विषय वर्ज नसला तरी विषय शिक्षणाच्या कोणत्या तरी प्रकारच्या शिक्षणाच्या अंगाने तो विषय जाणारा असावा. मग ती आर्थिक साक्षरता का असेना. दुसरं वैशिष्ठे म्हणजे विषयाची प्रसंगीता! वर वर्णन केल्या प्रमाणे शिक्षण प्रक्रिया ही स्थिरपद झालेली कृती नाही तर ती सातत्याने बदलणारी असून वेळोवेळी अनेक रूपं धारण करणारी असते. अशावेळी त्याततत्काळ उद्भवणाऱ्या समस्येचं स्वरूप, व्याप्ती, प्रभावित करणारे घटक आणि ती सोडवण्याचे उपाय हे त्यात्या वेळी उपलब्ध करून द्यावे लागतात. त्यामुळे विषयांची, त्यांच्या अंगांची संख्या कैक पटीने वाढते. आणि मग सुरु होतो त्या त्या विषयांतील तज्ञ आणि त्या विषयाला न्याय देणारे लेखक यांचा शोध! अडचण अशी की जे तज्ञ असतील ते लेखक असतीलच असे नाही, आणि जे लेखक असतील ते त्या त्या विषयांचे तज्ञ असतीलच असेही नाही. म्हणजे तज्ञ अशा लेखकांचा शोध सुरु होतो. म्हणजे ते दुहेरी अडचणींचं ठरते. ते असं की वेळोवेळी उद्भवलेल्या समस्या त्यांचे पैलू आणि त्यांना न्याय देणारे लेखक शोधणे. या बाबतीत विचार केला तर “तुम्ही आम्ही पालक” या मासिकाने यशस्वीपणे आपली कामगिरी पार पडलेली आहे असे दिसून येईल. मागील काही वर्षांतील नुसत्या विषयांचा जरी विचार केला तर त्याचे विविधांगी, सखोल, सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत केलेली मांडणी, उपायांची सोडवणूक आणि व्यावहारिकता नक्कीच लाक्षणीय आहे असं लक्षात येईल. कोणते विषय यात आले असं न विचारता कोणते विषय यात आले नाहीत? असा प्रश्न विचारावा लागेल, इतकी विषयांची संख्या आणि व्याप्ती या सर्व लेखांची आहे असं दिसून येईल. जरी काही विषय प्रासंगिक असले तरी काही विषय शास्वत स्वरूपाचेही आहेत. त्यामुळे या मासिकाच्या सर्वच अंकांना संग्रह करण्याचे मोल प्राप्त झाले आहे, आणि अनेकांनी ते संग्रहित करून पण ठेवलेले आहेत. बरं मासिक जरी पालकांना डोळ्यासमोर ठेऊन प्रकाशित करण्यात येत असलं आणि ते पालकांना निश्चितपणे उपयोगी पडत असलं तरी ते या क्षेत्रात काम करणारे शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी, संस्थाचालक, आणि या विषयात रस असणाऱ्या व्यक्ती यांनाही उपयोगी पडतील असे लेख यात आलेले आहेत आणि वेळोवेळी संबंधीतांनी तसं नमूद केलेलं आहे. मासिकाची वैशिष्ठ्ये १. मासिकाची संग्राहिता–या मासिकानं एक नियम सातत्यानं पाळला आहे तो म्हणजे प्रत्येक अंकासाठी विषयांची निवड. एकाच वेळी अनेक संख्येने विषय आलेले आहेत असं दिसून येणार नाही, तर प्रत्येक अंकासाठी विषय आगाऊ जाहीर करण्यात येतात आणि त्या विषयांवर तज्ञ लेखक आपले लेख सादर करतात. विशिष्ठ विषयांना अंक वाहिलेला असल्याने ज्या विषयाची गरज वाटत असेल तो पूर्ण अंक संग्रही ठेवता येतो किंवा उघडून वाचता येतो. त्यामुळे एकाच विषयासाठी अनेक अंक धुंडाळण्याची गरज उरत नाही. म्हणून या मासिकाची संग्राहिता वाढलेली आहे. २. लेखकांची निवड- या मासिकात लेख लिहिणारे त्या विषयातील तज्ञच असतील असे दिसून येईल. कोणत्या क्षेत्रातील लेखक आहेत, असं विचारण्यापेक्षा कोणत्या विषयातील व क्षेत्रातील लेखक नाहीत असा प्रश्न विचारणे संयुक्तिक ठरेल. शैक्षणिक तर आहेच पण त्यातीलही विशिष्ठ बाबीत त्या विषयाचं सखोल ज्ञान आहे असेच लेखकांचे लेख यात दिसतील. या शिवाय आर्थिक, सामाजिक, मानसिक, वैज्ञानिक, प्रशासनिक, व्यवस्थापन क्षेत्रातील दिग्गज आणि तज्ञांची मांदियाळी यात दिसून येईल. या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यास अशा मासिकाची नितांत आवश्यक्ता होती हे स्पष्ट होईल. पालकांकरीता असलेल्या नियतकालीकाला ज्या कसोट्या लावल्या जातात त्या सर्व कसोट्यांवर खरे उतरलेले मासिक म्हणून या मासिकाचा उल्लेख करता येईल. असं असलं तरी मराठी नियतकालीकांच्या नशिबात जे भोग असतात ते थोड्याफार प्रमाणात याही मासिकाला चुकले नाहीत. ते म्हणजे एवढी उपयोगिता असूनही, असंख्य शाळा, शिक्षक, असंख्य पालक असूनही त्या प्रमाणात या मासिकाचे वर्गणीदार नाहीत. ते वाढण्याची गरज आहे. जाता जाता वैयक्तिक रित्या मला जे जाणवते ते असं की हे मासिक जाहिराती शिवाय प्रकाशित करण्यात येते असं बहुतेक अंकात जाहीर करण्यात येते. मान्य आहे की जाहिरात हा एक उत्पन्नाचा स्रोत असतो. परंतु जाहिरातींचा तेवढाच एक उपयोग नसतो. जाहिरातींचा दुसरा फायदा असा असतो की काहींना काही उत्पादनाची गरज असते. बरेचदा लेखांमध्ये त्यांचा उल्लेख पण असतो. परंतु ती उत्पादने किंवा सेवा कुठे, कसे आणि किती किमतीत मिळतील याची माहिती नसते. तेव्हा जाहिराती सुरु करण्यात याव्यात असं मला सुचवावंसं वाटते. भलाही कोणत्या प्रकारच्या जाहिराती घ्याव्यात आणि कोणत्या घेऊ नयेत याचं धोरण ठरवण्यात यावे. मासिकाची निर्मितीमूल्ये आणि सम्पूर्ण रंगीत अंकाचा विचार करता ७००/- रुपये वार्षिक वर्गणी फार नाही. दिवाळी अंकासहित ११ दर्जेदार अंक. एक दिवस हॉटेलला किंवा सिनेमाला गेलो तरी त्यपेक्षा जास्त खर्च होतील. शिवाय या मासिकाचा एकही नवा पैसा ना संस्था वापरत किंवा मालक स्वत:साठी. साद माणुसकीची अभियानाचे ते मुखपत्र आहे आणि नफा झालाच तर तो सामाजिक कामासाठी वापरला जाणार असल्याने वर्गणीदारांना तो दुहेरी लाभ आहे. उत्तम दर्जाच्या निर्मितीमूल्याच्या साहित्य वाचनासह अप्रत्यक्षपणे सामाजिक कामाला हातभार लागणार आहे. म्हणजे थोडक्यात ‘आम के आम और गुठलीओंके दाम’. त्यामुळे सर्व सुजाण पालकांनी आणि शिक्षकांनी तर या मासिकाचा आस्वाद घ्यायला वर्गणीदार व्हायलाच हवे. संपादक श्री हरीश बुटले यांचेशी आपण थेट ९४२२००१५६० या क्रमांकावर संपर्क साधू शकाल. या मासिकाच्या सुरुवातीच्या काळापासून मी जुळलेलो आहे, त्याची वाटचाल बघितली आहे. ५ वर्षाचा कालावधी काही थोडाथोडका नव्हे. आतापर्यंत एकूण ५५ अंक प्रकाशित झालेले आहेत. मालक आणि प्रकाशक यांचं भक्कम पाठबळ आहे. त्यामुळे मासिक तर सुरु राहीलच, नवनव्या विचाराला जन्म दिल्या जाईल आणि त्यांना या मासिकात स्थान मिळेलच, यात शंका नाही. मात्र आपल्यासारखी सुजाण जनता अश्या प्रकल्पाला आधार देवू शकलो नाही तर आपणच कपाळकरंटे ठरू.
अनिल अवचट
शशिक्षण ही आपली चुकलेली वाट आहे हे आता लोकांना कळू लागलेलं आहे. अभ्यासाचं ओझं आणि प्रचंड प्रमाणात असलेली स्पर्धा यांचा तान पालकांवरही तेवढाच जास्त आहे. मात्र या व्यवस्थेला नकार देण्याचं धाडस त्यांच्यात नाही. या मासिकाद्वारे विचारमंथन व्हावं, लोकांना आपले विचार मांडण्याची मोकळीक मिळावी असा मला वाटत. `तुम्ही आम्ही पालक' या मसिकास माझ्या मनापासून शुभेच्छा.

विनायकदादा पाटील
शिक्षण विषय डोळ्यासमोर ठेवून पालकांसाठी अशा प्रकारचे मासिक सुरू होतं आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचं लिखाण लोकांसमोर येणं आवश्यक आहे. मात्र अनेकदा सुरुवात खूप जोरात होते आणि नंतर त्यात सातत्य राहत नाही. तेव्हा हे सातत्य राहील ही अपेक्षा करतो. हा विषय समाजहिताचा आहे. `तुम्ही आम्ही पालक' या मसिकास माझ्या हर्दिक शुभेच्छा.

वसंत काळपांडे
केंद्र शासनआणि महाराष्ट्र शासन यांची धोरणे, देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, इतर देशांमध्ये काय चालले आहे त्याचा आढावा आणि या सर्वांवरील भाष्य या मासिकात असेल असे मी गृहीत धरून आहे आणि तसे असावेही. एकदा मासिक बाहेर पडल्यानंतर वाचकांना काय वाटते त्याचा फीडबॅक घेऊन मासिकाच्या प्रवासाची पुढची दिशा ठरवता येईल. या नवीन मासिकाला ‘तुम्ही आम्ही पालक’साठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!

विद्या बाळ
आजच्या तरूण मुलांशी संवाद साधताना आजचा पालक कमी पडतो आहे. ही जनरेशन गॅप तो भरून काढण्यास तो असमर्थ ठरतो आहे. आजची तरूण पिढी खूपच सक्षम आहे. पण आम्ही पालक कमी पडतो आहोत याचं कारणच मुळी आडात नाही तर पोहो-यात कुठून येणार? अशा प्रकारच्या मासिकाची आज अत्यंत आवश्यकता आहे. कारण आजच्या मुलांचे प्रश्न हाताळणं आम्हाला जमत नाहीये. खूपदा पालक मुलांना म्हणतात, आम्ही अनेक पावसाळे बघितलेत, पावसाळे नुसते बघून उपयोग नाही, तर बदलती आव्हानात्मक परिस्थिती समजून घेणंही गरजेचं आहे. मुलांसमोर येणा-या खडतर आव्हानांपुढे पालकांनी भयभीत होता कामा नये. आज मुलांना काय द्यायचं आणि काय द्यायचं नाही हे आम्हाला कळत नाहीये. अशा पालकांनी या मासिकातून बोलावं - नव्हे अशा पालकांशी या मासिकाने बोलावं. आजच्या पालकांसाठी कार्यशाळा घेण्याची आवश्यकता मला वाटते. हे मासिक अशा प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करेल या आशेसह `तुम्ही आम्ही पालक' या मासिकास खूप खूप शुभेच्छा.

Our Social Initiative

GET INVOLVED IN OUR TOP CLASS SOCIAL INITIATIVE

DEEPER
MahaExam
Tumhi Aamhi Palak
Saad Manuskichi